मोर्चा , महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री

मागच्या काही दिवसात राणेंच्या भाजपा प्रवेशाबाबतीत चर्चा चालू आहे तेंव्हा एकंदर महाराष्ट्रातील राजकारणाचा व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक ठरते .

कोपर्डीच्या बलात्काराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात ‘ मूक मराठा मोर्चा ‘ निघाले तत्पूर्वी ह्या घटनेच्या काही दिवस आधी दलित समाजातील एका युवतीवर सवर्णांनी बलात्कार केल्याच्या निषेधात औरंगाबादेत दलित समाजाचे मोर्चे निघाले व त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाने महाराष्ट्रभर मोर्चे काढले व त्याची सांगता ९ ऑगस्ट च्या मुंबईतील मोर्चाने झाली.

९ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण देण्याचे मान्य केले आणि काही काळापुरता वाद शमला . एकंदर मोर्चा बलात्काराविरोधात निघालेला कि आरक्षणासाठी हे मात्र सर्वसामान्यांना कळण्याच्या बाहेरच आहे . मुळातच बलात्काराचा निषेध करायला आम्ही जातीचा आधार घेत आहोत हि सगळ्यात दुर्दैवी बाब आहे .एखाद्या वाईट गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही जात पाहतो ह्यासारखी वाईट गोष्ट ती पुरोगामी महाराष्ट्रासाठी ती कोणती ?
राज्यातील भाजप सरकारला २०१९च्या निवडणुकांमध्ये सरशी करायची असेल तर मोर्चावर तोडगा काढणे अत्यंत आवश्यक होत जवळजवळ ४० टक्के समाजाचा रोष ओढवून निवडणूक नक्कीच सोपी जाणार नाही याची खात्री सरकारला आहे. आधीच ब्राह्मण मुख्यमंत्री असल्यामुळे सरकारला जातीय संघटनांचे कमी ताप नव्हते त्यात परत एवढा मोठा मोर्चा हाताळणे नक्कीच सोपी गोष्ट नव्हती . पण फडणवीसांनी व एकंदर भाजपने सत्तेत आल्यापासून सर्व जातींना एकेक मंत्रिपद देऊन पुरोगामीपणा दाखवला . मराठा समाजातील विनायक मेटेंना विधान परिषदेवर घेतलं पण तेवढ्यावर काही भागले नाही नंतर कोल्हापूरच्या संभाजीराजेंना खासदारपदी घेतलं मुंबईतील मोर्च्याच्या २ दिवस आधी संभाजीराजेंना मंत्रिपद भेटणार अशी चर्चा होती मात्र त्यांनी काही उपयोग होणार नाही असा विचार केल्याने तो निर्णय टाळला असावा . अजूनही सरकारला मराठा समाजाला फोडण्यातच खरा फायदा आहे हे माहिती आहे मेटे,संभाजीराजे यांच्यानंतर राणे भाजपमध्ये आले तर संभाजीराजेंमुळं काही पश्चिम महाराष्ट्राचा भाग मेटेंमुळं मराठवाड्याचा काही भाग तर राणे आणि त्यांच्या असामान्य कर्तृत्ववान दोन सुपुत्र नितेश आणि निलेश यांच्यामुळं कोकणातील काहीभागातील मराठा समाज भाजपाकडे वळू शकतो . सेनेला शह देण्यासाठी सुद्धा हि चाल खेळली ‘जात’ असावी .

राणे तर भाजप मध्ये आले नाहीत परंतु ते NDA असतील हे मात्र नक्की या द्वारे राणेंसारख्या कुठल्याही पक्षास ‘ अडचण ‘ असणाऱ्या नेत्याला घ्यायचाही नाही मात्र बाहेरून पाठिंबा घेऊन सत्ता टिकवायची अन सेनेलापण हिंवायचा हाच भाजपचा अजेंडा असेल .
शेतकऱ्यांचा संप , मोर्चा , जातीयवाद ह्या गोष्टी कितीही फडणवीसांच्या विरोधात गेल्या तरी त्याच्या तोटा भाजपाला व फडणवीसांच्या खुर्चीला होणार नाही ; याची मीमांसा करताना मुख्यत्वे दोन करणे लक्षात येतात म्हणजे बऱ्यापैकी कमकुवत विरोधी पक्ष , राज्यात एकंदरच नेत्तृत्वाचा अभाव आणि झालेल्या मोर्चास चेहऱ्याचा अभाव !
काँग्रेसला सध्या असाच दिन नसल्याने अगदी दिल्ली पासून गल्ली पर्यंत नेते कार्यकर्ते अगदी ‘दीन’ मार्गलीड आहेत ; स्वतः पक्ष अध्यक्षापासून सर्व गोंधळलेल्या अवस्थेत असलेली सेना आणि अत्यंत भटकलेली मनसे तेंव्हा पर्याय फक्त पवारांच्या राष्ट्रवादी कडे होता मात्र सक्रिय राजकारणात आज पवार आधी सारखे नाहीत आणि त्यांना सुद्धा मोर्चाचा फारसा फायदा उठवता आलेला नाहीये .

दुसरा मुद्दा असा आहे कि मोर्चास नसलेला चेहरा मराटह मोर्चाला काही चेहरा नाही तो समाजाने काढलेला उस्फुर्त मोर्चा होता. जरी सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केला नाहीत तरी लोकांपुढे भाजपाला मत नाही टाकणार या शिवाय पर्याय नाही. कारण मराठा समाज स्वतःच मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्ष संघटनात विखुरलेला आहे. जाणते राजे जरी सगळ्यात मोठे नेते असले तरी सैनिकांमध्ये अन कट्टर सैनिकांमध्ये सगळ्यात जास्त मराठाच आहेत. तसाच महाराष्ट्राच्या विविध भागात काँग्रेस,सेने, भाजप, मनसे यांना सुद्धा मराठ्यांचा पाठिंबा आहेच. त्यात अजून संभाजी ब्रिगेडने पक्ष काढल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांची सुद्धा वेगळीच भूमिका असेल.

राज्यात येत्या २ वर्षात तर केंद्रात येत्या १ ते दीड वर्षात निवडुकांचं बिगुल वाजेल. फसलेली नोटबंदी, वाढलेले इंधनाचे दर,GST, या मुले केंद्र सरकारवर किती फरक पडेल याचा उत्तर देना सोपा असेल ! पडलेला फरक अत्यंत अत्यल्प असेल. कारण निवडणुकांच्या आधी ६ महिने मोदी शहा जोडगोळी अशी हवा करणार कि ५ वर्षात जणू काय काय झाले आहे. अन त्याला प्रत्युत्तर देण्यास मरगळीत व नेतृत्वहीन असलेली काँग्रेस. १९ला भाजप स्वबळावर सरकार बनवेल कि नाही हे जरी सांगणं अवघड असला तरी सरकार भाजपप्रणित NDAच असणार यात काही शंका नाही !

परत महाराष्ट्रात चेहऱ्याच्या अभावामुळे परत झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकांवर होईल व परत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवेल मात्र भाजप सत्ता टिकवणार का नाही हे सांगणे कठीण आहे. धनंजय मुंडे, अशोक चव्हाण, राज ठाकरे यांनी मेहनत घेतली तर पक्षाची स्थिती मजबूत नक्कीच करू शकतात मात्र एकहाती सत्ता मिळवण्यास मोर्चाचा फायदा कोणत्याही विशिष्ट पक्षास घेता येणार नाही.

या गोष्टी झाल्या राजकीय मात्र सामाजिक दृष्ट्या मोर्चा खूप महत्वाचा ठरतो बऱ्याचश्या चांगल्या गोष्टी लक्षात येतात त्यात सगळ्यात महत्वाची म्हणजे लोकांचा असलेला व्यवस्थेवरचा विश्वास. एवढ्या मोठ्या मोर्चाचं नियोजन, कुठल्याही मोर्चात दंगा गोंधळ नाही हि लोकशाहीसाठी खूप सकारात्मक गोष्ट आहे. हरयाणातील जात व गुजरातमधील पटेल लोकांचे मोर्चे पाहिले तर मराठा समाजाचे मोर्चे अत्यंत अभिनंदनीय आहेत मात्र एवढे मोठे मोर्चे उस्फुर्त असतात हा कुतूहलाचा भाग आहे.

बलात्कार्यांना फाशी द्या ह्या मागणी पासून सुरु झालेला मोर्चाच्या शेवटच्या मोर्चात मात्र हि मागणी काही केंद्र स्थानी नव्हती. बलात्कार्यांना फाशी द्या ह्या मुख्य मागणीच्या मोर्चाचं रूपांतर ‘आरक्षण द्या नाहीतर घरी जा’ या मोर्चात का झालं कि रोष आधीपासूनच होता व बलात्कार केवळ ठिणगी पडायचं कारण होतं कि ‘आपला’ मुख्यमंत्री झाला नाही हि बाब काहींना रुजली नाही अन त्यांनी वातावरण पेटवलं, कि हि इतर पक्षांची व नेत्यांची चाल होती, ह्या सगळ्या तारकांना फाटा मारायचा अन मोर्चा उस्फुर्त होता मान्य करायचं !

ऍट्रॉसिटी रद्द करा, आरक्षण द्या ह्या मागण्या रास्त जरी असल्या तरी बलात्कारासारख्या सामाजिक रोगाला जातीय रंग देणं हे पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दव्य आहे ! एखाद्या अबलेवर झालेल्या अत्याचाराचा विरोध आम्ही पीडित स्त्रीची जात पाहून करणार का हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s