मायानगरी-१

हे कोण?

मलाही नाही माहीत, मुंबईत सायन हॉस्पिटलच्या बाहेर पडलेले दिसले. अशात माझी मुंबईत येजा वाढल्याने हे दृश्य काही नवीन नाही. पण ह्यांना पाहिलं मग वर पाहताच ‘दारू सोडवा’च पोस्टर पाहिलं अन फोटो काढला. ह्यानी त्याकडे पाठही केलेली नाही अन हातही पसरलेले नाहीत. येणाऱ्या जाणाऱ्यांना यांना सहानुभूती द्यायला वेळ नाही अन शिव्या द्यायला पण नाही.

कदाचित दारू सोडवून काय करावं याचं उत्तर नसल्याने फोटोकडे हात केले नसतील. ह्यांनी ‘हात’ दाखवले ते बंद झालेल्या दुकानाच्या शटरला कदाचित विचारांचं वावटळ बंद व्हावं म्हणत असतील. ‘पाय’ मात्र दवाखाण्याकडे जाणाऱ्या रस्त्याकडे केलेत. झाकलेली ‘नजर’ पण काळोखाकडे आहे तर पृथ्वीला ‘पाठ’ दाखवुन काय म्हणत असतील बरं हे ?

Advertisements

कोसला

परवा अगदी रात्रीच्या २च्या शांत प्रहरात लायब्ररीत बाजूच्या टेबलवर कोसला दिसली अभ्यासात लक्ष लागत नव्हता म्हणून सहज २-४ पाने चाळायची म्हणून हातात घेतलेलं कोसलाचे ५० पाने संपून पांडुरंग सांगवीकरच्या नादाला लागलो अगदी कळलंच नाही .

अगदी पन्नास पान वाचल्यानन्तर पुस्तकाचे पाहिले काही पान शेवटचे काही पान प्रकाशक,प्रकाशन,वर्ष,आवृत्त्या, किंमत कुणाला उद्देशून लिहलंय हे वाचल्यानंतर मी परत पुस्तक वाचायला लागलो व शंभरेक पाने झाल्यानंतर परत कोसला त्या टेबलवर ठेऊन पहाटे पाच साडेपाचच्या सुमारास रूमकडे गेलो .

एखाद्या गोष्टीचा खूप काळ प्रभाव राहतो जेंव्हा त्या गोष्टीला आपण आपल्या आयुष्याशी रिलेट करतो अगदी तसंच काहीसा मला रूमवर जाताना झालं पांडुरंग तर आपलंच एक व्हर्जन आहे असं विचार करत पाणी पिऊन झोपलो . पहाटे झोपून दुपारी २ ला उठायची सवय काही नवीन नाही अगदी पांडुरंगासारखी या झोपेत रात्री जागून जगलेल्या शांततेचा एक प्रभाव असतो एकदम शांत झोप ; स्वप्न नाही काही नाही . दोनेक वाजता उठून आवरून खाऊन परत पाचेक वाजेपर्यंत कोसलाचा फारसा विचार आला नाही . खुर्चीवर बसलो , पुस्तक उघडलं काल काय केलं आठवत असताना एकदम कोसला ची आठवण झाली व त्या टेबलकडे गेलो तर तिथं काही कोसला नव्हतं . जाऊद्या च्यायला बरं झालं नाहीये नाहीतर परत आजचा दिवस परत वाया जाऊन टाइमपास झाला असता असं वाटून परत पुस्तक वाचत बसलो पण पुस्तकात लक्ष काही लागत नव्हतं . मी तडक आप्पा बळवंत चौकाकडे निघालो कोसला घेतलं अन आलो लायब्ररीत एव्हाना भूक लागली पुस्तक बॅगेत ठेवलं रात्रभर भूक लागू नये असा पोटभर नाश्ता केला परत लायब्ररी .

पांड्याचे मित्रमैत्रिणी, त्याच्या व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रोग्रॅम, फिरण्याच्या सवयी , सिगरेटचे व्यसन ,आईवडील घरची परिस्थिती या सगळ्या गोष्टी आपल्यापासून वेगळ्या असली तरीपण मित्रान्सोबतच फाटक वागणं , लहरीपणा , परीक्षा जवळ अली कि रात्री उशिरा जागून पहाटे झोपायची सवय नंतर ती सवय मोडण्यासाठी एकेक दिवस सकाळीपण न झोप येणं व परीक्षा होइस्तर हि सवय मोडायची वाट बघत बसणं त्यासाठीच झगडणं , आज जर काही नाही केलं तर उद्या काही काम धंदा नसणार म्हणूनची चिंता या मला अन पांडूला जोडणारा समान धागा होता .

गावातून पुण्यात यायचं आकर्षण नंतर पुण्यातला मोकळेपणा स्वतंत्र राहणं ,उनाडपणे भटकणं नंतर काहीही बाहेरच खाणं , वाट्टेल तेंव्हा सिनेमा पाहणं हि त्याच्या सारखीच माझ्या आयुष्यातील सुंदर दुर्दैवी गोष्ट आहे असं मला वाटलं .

एखादं पुस्तक, कादंबरी जेंव्हा वाचतो किंवा एखादा सिनेमा पाहतो त्या आधी त्याबद्दलची एक पार्श्वभूमी, शेवट , मुख्य विषय यापैकी शक्यतो आपल्यला काहीतरी माहित असतं मात्र एकदम काहीच माहित नसलेलं पुस्तक आपल्या हातात पडत ज्याच्या नावाचं अर्थ सुद्धा आपल्याला माहित नाहीये तेंव्हा याचा शेवट काय असेल या उत्सुकतेनेच माणूस पुस्तक संपवतो . कोसला बाबतीतही काहीस असंच होत . जेंव्हा पुस्तकाचा एक खंड संपतो तेंव्हा वाटत कि पुढे पांडुरंगाला आयुष्यात खूप त्रास होईल , नेहमी खटके उडत असलेले वडील घर बाहेर काढतील ,रमीबरोबर लग्न होईल , किंवा लग्नच होणार नाही अन म्हाताऱ्या सांगवीकराचा कुठे तरी दुर्दैवी अंत होईल . पण ह्या सगळ्या गोष्टी सुरु व्हायची वाट बघत असतानाच चवथा खंड संपतो . अगदी पांडुरंग सारखीच चहाची तलफ , मनातली घालमेल घालवण्यासाठी केलेले वेगवेगळे प्रयोग सुस्तपणायात कुठे तरी मी माझ्यात पांडुरंग किंवा पांडुरंगाच्या मी शोधात होतो .

पांडुरंगाचे आयुष्याबाबतचे विचार हा भाग सोडून जेंव्हा शेवटचे दोन खंड त्याच्या गावाकडील दिवसांबद्दल येतात गावाकडील लोक त्यांचं राहणीमान, प्रथा , बेरोजगारी ,लोकांच्या नानाप्रकारच्या तऱ्हा हा भाग अत्यंत अफाट लिहला आहे .आपल्याला आयुष्यात भरपूर वाचायचं आहे परंतु भरपूर वाचलेले मित्र तरी कुठं फार शहाणे आहेत एकंदर आयुष्यात ग्रेट होऊन करायचंय तरी काय हे प्रश्न आपल्यातल्या पांडुरंगला सुद्धा पडलेले असतात त्याचे उत्तरं मिळतील या उत्कंठे पायी कोसला वाचत जातो

कोसलाचा शेवट मात्र अगदी डेविड फिन्चरच्या ” Zodiac ” किंवा स्कॉरसीझीच्या “Shutter Island ” सारखा आहे , एकदम वेगळा ,अनपेक्षित .

कोसलाच्या शेवट नंतर नेमाडेंचे ५० व्या वर्षानिम्मितच्या आवृत्तीवेळेसच्या भावना कोसला कशी घडली त्याची गोष्ट , वाचकांच्या प्रतिक्रिया , प्रकाशक सोबतचे उडालेले खटके व बराच काही पण सगळ्यात महत्वाचा भाग असा कि कोसला कि नेमाडेंचीच कथा आहे त्याच्या आयुष्यातल्याच घटना म्हणजे पांडुच आयुष्य . पंचविशीत असणारा तरुण आपली गोष्ट लिहतो मात्र त्याला आत्मचरित्र म्हणू शकत नाही काही कारण त्याच काही कर्तृत्व नाही म्हणून कोसला घडते .

एकंदर कादंबरी म्हणलं कि एखाद्या व्यक्तीच चरित्र त्याला आलेल्या अडचणी त्यातून काढलेला मार्ग किंवा एखादा खलनायक त्याचा क्रूरपणा या सगळ्यात समाजाने त्याला दिलेली चुकीची वागणूक किंवा समाजाने केलेला परोपकार या नंतर आपण जग हे मित्थ्या आहे किंवा जग हे सुन्दर आहे म्हणायला मोकळे ; या सगळ्या गोष्टींना फाटा देत केवळ एखादया माणसाची जग पाहायची पद्धत अन त्याचे अनुभव यावर कोसला मन जिंकते यात पांडुरंग चांगला नाही अन वाईटही नाही त्याच्या नजरेनी दुनिया सुद्धा चांगली नाही अन वाईटही नाही .

मोर्चा , महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री

मागच्या काही दिवसात राणेंच्या भाजपा प्रवेशाबाबतीत चर्चा चालू आहे तेंव्हा एकंदर महाराष्ट्रातील राजकारणाचा व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक ठरते .

कोपर्डीच्या बलात्काराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात ‘ मूक मराठा मोर्चा ‘ निघाले तत्पूर्वी ह्या घटनेच्या काही दिवस आधी दलित समाजातील एका युवतीवर सवर्णांनी बलात्कार केल्याच्या निषेधात औरंगाबादेत दलित समाजाचे मोर्चे निघाले व त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाने महाराष्ट्रभर मोर्चे काढले व त्याची सांगता ९ ऑगस्ट च्या मुंबईतील मोर्चाने झाली.

९ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण देण्याचे मान्य केले आणि काही काळापुरता वाद शमला . एकंदर मोर्चा बलात्काराविरोधात निघालेला कि आरक्षणासाठी हे मात्र सर्वसामान्यांना कळण्याच्या बाहेरच आहे . मुळातच बलात्काराचा निषेध करायला आम्ही जातीचा आधार घेत आहोत हि सगळ्यात दुर्दैवी बाब आहे .एखाद्या वाईट गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही जात पाहतो ह्यासारखी वाईट गोष्ट ती पुरोगामी महाराष्ट्रासाठी ती कोणती ?
राज्यातील भाजप सरकारला २०१९च्या निवडणुकांमध्ये सरशी करायची असेल तर मोर्चावर तोडगा काढणे अत्यंत आवश्यक होत जवळजवळ ४० टक्के समाजाचा रोष ओढवून निवडणूक नक्कीच सोपी जाणार नाही याची खात्री सरकारला आहे. आधीच ब्राह्मण मुख्यमंत्री असल्यामुळे सरकारला जातीय संघटनांचे कमी ताप नव्हते त्यात परत एवढा मोठा मोर्चा हाताळणे नक्कीच सोपी गोष्ट नव्हती . पण फडणवीसांनी व एकंदर भाजपने सत्तेत आल्यापासून सर्व जातींना एकेक मंत्रिपद देऊन पुरोगामीपणा दाखवला . मराठा समाजातील विनायक मेटेंना विधान परिषदेवर घेतलं पण तेवढ्यावर काही भागले नाही नंतर कोल्हापूरच्या संभाजीराजेंना खासदारपदी घेतलं मुंबईतील मोर्च्याच्या २ दिवस आधी संभाजीराजेंना मंत्रिपद भेटणार अशी चर्चा होती मात्र त्यांनी काही उपयोग होणार नाही असा विचार केल्याने तो निर्णय टाळला असावा . अजूनही सरकारला मराठा समाजाला फोडण्यातच खरा फायदा आहे हे माहिती आहे मेटे,संभाजीराजे यांच्यानंतर राणे भाजपमध्ये आले तर संभाजीराजेंमुळं काही पश्चिम महाराष्ट्राचा भाग मेटेंमुळं मराठवाड्याचा काही भाग तर राणे आणि त्यांच्या असामान्य कर्तृत्ववान दोन सुपुत्र नितेश आणि निलेश यांच्यामुळं कोकणातील काहीभागातील मराठा समाज भाजपाकडे वळू शकतो . सेनेला शह देण्यासाठी सुद्धा हि चाल खेळली ‘जात’ असावी .

राणे तर भाजप मध्ये आले नाहीत परंतु ते NDA असतील हे मात्र नक्की या द्वारे राणेंसारख्या कुठल्याही पक्षास ‘ अडचण ‘ असणाऱ्या नेत्याला घ्यायचाही नाही मात्र बाहेरून पाठिंबा घेऊन सत्ता टिकवायची अन सेनेलापण हिंवायचा हाच भाजपचा अजेंडा असेल .
शेतकऱ्यांचा संप , मोर्चा , जातीयवाद ह्या गोष्टी कितीही फडणवीसांच्या विरोधात गेल्या तरी त्याच्या तोटा भाजपाला व फडणवीसांच्या खुर्चीला होणार नाही ; याची मीमांसा करताना मुख्यत्वे दोन करणे लक्षात येतात म्हणजे बऱ्यापैकी कमकुवत विरोधी पक्ष , राज्यात एकंदरच नेत्तृत्वाचा अभाव आणि झालेल्या मोर्चास चेहऱ्याचा अभाव !
काँग्रेसला सध्या असाच दिन नसल्याने अगदी दिल्ली पासून गल्ली पर्यंत नेते कार्यकर्ते अगदी ‘दीन’ मार्गलीड आहेत ; स्वतः पक्ष अध्यक्षापासून सर्व गोंधळलेल्या अवस्थेत असलेली सेना आणि अत्यंत भटकलेली मनसे तेंव्हा पर्याय फक्त पवारांच्या राष्ट्रवादी कडे होता मात्र सक्रिय राजकारणात आज पवार आधी सारखे नाहीत आणि त्यांना सुद्धा मोर्चाचा फारसा फायदा उठवता आलेला नाहीये .

दुसरा मुद्दा असा आहे कि मोर्चास नसलेला चेहरा मराटह मोर्चाला काही चेहरा नाही तो समाजाने काढलेला उस्फुर्त मोर्चा होता. जरी सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केला नाहीत तरी लोकांपुढे भाजपाला मत नाही टाकणार या शिवाय पर्याय नाही. कारण मराठा समाज स्वतःच मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्ष संघटनात विखुरलेला आहे. जाणते राजे जरी सगळ्यात मोठे नेते असले तरी सैनिकांमध्ये अन कट्टर सैनिकांमध्ये सगळ्यात जास्त मराठाच आहेत. तसाच महाराष्ट्राच्या विविध भागात काँग्रेस,सेने, भाजप, मनसे यांना सुद्धा मराठ्यांचा पाठिंबा आहेच. त्यात अजून संभाजी ब्रिगेडने पक्ष काढल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांची सुद्धा वेगळीच भूमिका असेल.

राज्यात येत्या २ वर्षात तर केंद्रात येत्या १ ते दीड वर्षात निवडुकांचं बिगुल वाजेल. फसलेली नोटबंदी, वाढलेले इंधनाचे दर,GST, या मुले केंद्र सरकारवर किती फरक पडेल याचा उत्तर देना सोपा असेल ! पडलेला फरक अत्यंत अत्यल्प असेल. कारण निवडणुकांच्या आधी ६ महिने मोदी शहा जोडगोळी अशी हवा करणार कि ५ वर्षात जणू काय काय झाले आहे. अन त्याला प्रत्युत्तर देण्यास मरगळीत व नेतृत्वहीन असलेली काँग्रेस. १९ला भाजप स्वबळावर सरकार बनवेल कि नाही हे जरी सांगणं अवघड असला तरी सरकार भाजपप्रणित NDAच असणार यात काही शंका नाही !

परत महाराष्ट्रात चेहऱ्याच्या अभावामुळे परत झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकांवर होईल व परत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवेल मात्र भाजप सत्ता टिकवणार का नाही हे सांगणे कठीण आहे. धनंजय मुंडे, अशोक चव्हाण, राज ठाकरे यांनी मेहनत घेतली तर पक्षाची स्थिती मजबूत नक्कीच करू शकतात मात्र एकहाती सत्ता मिळवण्यास मोर्चाचा फायदा कोणत्याही विशिष्ट पक्षास घेता येणार नाही.

या गोष्टी झाल्या राजकीय मात्र सामाजिक दृष्ट्या मोर्चा खूप महत्वाचा ठरतो बऱ्याचश्या चांगल्या गोष्टी लक्षात येतात त्यात सगळ्यात महत्वाची म्हणजे लोकांचा असलेला व्यवस्थेवरचा विश्वास. एवढ्या मोठ्या मोर्चाचं नियोजन, कुठल्याही मोर्चात दंगा गोंधळ नाही हि लोकशाहीसाठी खूप सकारात्मक गोष्ट आहे. हरयाणातील जात व गुजरातमधील पटेल लोकांचे मोर्चे पाहिले तर मराठा समाजाचे मोर्चे अत्यंत अभिनंदनीय आहेत मात्र एवढे मोठे मोर्चे उस्फुर्त असतात हा कुतूहलाचा भाग आहे.

बलात्कार्यांना फाशी द्या ह्या मागणी पासून सुरु झालेला मोर्चाच्या शेवटच्या मोर्चात मात्र हि मागणी काही केंद्र स्थानी नव्हती. बलात्कार्यांना फाशी द्या ह्या मुख्य मागणीच्या मोर्चाचं रूपांतर ‘आरक्षण द्या नाहीतर घरी जा’ या मोर्चात का झालं कि रोष आधीपासूनच होता व बलात्कार केवळ ठिणगी पडायचं कारण होतं कि ‘आपला’ मुख्यमंत्री झाला नाही हि बाब काहींना रुजली नाही अन त्यांनी वातावरण पेटवलं, कि हि इतर पक्षांची व नेत्यांची चाल होती, ह्या सगळ्या तारकांना फाटा मारायचा अन मोर्चा उस्फुर्त होता मान्य करायचं !

ऍट्रॉसिटी रद्द करा, आरक्षण द्या ह्या मागण्या रास्त जरी असल्या तरी बलात्कारासारख्या सामाजिक रोगाला जातीय रंग देणं हे पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दव्य आहे ! एखाद्या अबलेवर झालेल्या अत्याचाराचा विरोध आम्ही पीडित स्त्रीची जात पाहून करणार का हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे.